Maharashtra Budget 2021 : व्यापार-उद्योग क्षेत्राची निराशा – संतोष मंडलेचा

कृषी क्षेत्रावर आधारित अर्थसंकल्प

0

लोकराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला.  अर्थसंकल्प हा पूर्णता कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच करोना काळात या क्षेत्राने केलेली उलाढाल व अर्थव्यवस्थेला दिलेले पाठबळ विचारात घेऊन मांडलेला दिसत आहे.  तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे याचे आम्ही स्वागत करतो .

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरने बऱ्याच वर्षांपासून पर्यटन विषयाचे महत्त्व समजून घेऊन  पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव कामगिरी केली आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना  मिळण्याकरता प्रयत्न केला आहे.  महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे असून भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलते त्याचा विचार करून समृद्धी महामार्ग, विमानतळ पुणे, नाशिक रेल्वे मार्ग, शिवडी नावाशिवा प्रकल्प जलमार्ग इत्यादी पायाभूत मूलभूत गोष्टींवर भर देण्यात आला आहे पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्यामुळे त्याचा फायदा व्यवसाय उद्योग वाढीसाठी नक्कीच होईल.

छोटे व्यापारी- सूक्ष्म, मध्यम,  लघु उद्योग  यांनी कोरोना काळात खूप कठीण गोष्टींचा सामना केला असून अद्यापही स्थिर झालेला नाही. त्यांना  या अर्थसंकल्पातून काहीतरी आपल्या पदरी पडेल अशी आशा बाळगून बसले होते परंतु  त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे  हा अर्थसंकल्प एकंदरीत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकताना दिसत असला तरीही सूक्ष्म व लघु उद्योगांना यात समाविष्ट करणे महत्त्वाचे होते जे केले गेले नाही.

– संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महराष्ट्र चेंबर, कॉमर्स ॲण्ड ॲग्रिक्लचर इंडस्ट्रीज

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.