धक्कादायक : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीला OLX वर ३४ हजारांना गडवलं!

सोफाच्या व्यवहारातून एका भामट्याने खात्यातून काढले पैसे

0

नवी दिल्ली : ऑनलाइन भामट्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दररोज कोणाला ना कोणाला या भामट्यांनी गंडविले जातेच. पण मुख्यमंत्र्याच्याच मुलीला गंडविले गेले असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच मुलगी ओएलएक्स या प्रसिद्ध ऑनलाइन साइटवर सोफा विकत होती. यावेळी ग्राहक असल्याचे भासवून एका भामट्याने अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिला तब्बल ३४ हजार रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्ली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, हर्षिताने सोफा विकण्यासाठी OLX वर पोस्ट शेअर केली होती. एका भामट्याने ग्राहक असल्याचे भासवून तिच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. तसेच खरोखरच सोफा घ्यायचा आहे, हे हर्षिता पटवून दिले. त्यासाठी विश्वास बसावा म्हणून काही रक्कम हर्षिताच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर हर्षिताला एक क्युआर कोड स्कॅन करायला सांगितला. समोरील समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे हर्षिताने क्युआर कोड स्कॅन केला. लागलीच तिच्या खात्यातून २० हजार रूपये काढले गेले. यामुळे हर्षिताला धक्का बसला, त्यातून ती सावरत नाही, तोच पुढच्या काही वेळात १४ हजार काढले गेले. हर्षिताच्या खात्यातून तब्बल ३४ हजार रुपये त्या भामट्याने काढले. 

ऑनलाइन सोफा विकण्याच्या व्यवहारातून या भामट्याने तब्बल ३४ हजार रुपये काढल्याने हर्षिताला धक्काच बसला. दरम्यान, या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. केजरीवाल यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. मुलगी हर्षिता ही २०१४ मध्ये चर्चेत आली होती, जेव्हा तिने बारावीमध्ये ९६ टक्के गुण मिळवले होते. हर्षिता सध्या आयआयटी दिल्ली येथे रसायनशास्त्रातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.