धोका वाढला, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्येही कोरोनाचा उद्रेक; पाच राज्यांमध्ये अलर्ट!

0

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण सुरुवात केल्याने काहीसे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केल्याने सर्वांचीच चिंता वाढविली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची ही संभाव्य दुसरी लाट असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर केरळ, पंजाब, छत्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

शनिवारी केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्राने या राज्यांना पत्रकाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी सहा हजार २८१ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने यंत्रणा धास्तावली आहे. हीच स्थिती पंजाब आणि केरण या राज्यांमध्येही आहे. तर गेल्या ७ दिवसांमध्ये छत्तीसगढमध्ये नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे समोर येत असतानाच अचानकपणे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, छत्तीसगढसह केरळ, पंजाब, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये दिलासा 

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गेल्या २४ तासात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. आरोगय् मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, मिझोरम, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, लक्षद्वीप, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट समूह, दमण, दीवचा याठिकाणी कोरोनाचा संसर्ग खूपच कमी असून, मृत्यूदरही खूपच आटोक्यात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.