Cyrus Mistry Funeral : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार

मिस्त्री ५१ वर्षांचे होते, त्यांचे अपघाती निधन झाले

0

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा

टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायर मिस्त्री यांचे रविवारी (दि.४) अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्काराला सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातातनंतर मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मध्यरात्री 2 वाजून 27 मिनिटांनी त्यांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून सध्या त्यांचे मृतदेह हॉस्पिटलच्या शवागृहातच ठेवण्यात आले आहेत. सायरस यांचे बरेच नातेवाईक विदेशात असून ते आज संध्याकाळपर्यंत भारतात पोहचण्याचा अंदाज आहे.

मिस्त्री यांच्यावर वरळी स्मशानभुमीत अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पारशी धर्मातील अत्यंविधीच्या पद्धतीनुसार अत्यंसंस्कार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पारशी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ म्हणतात.

यात मृतदेह ‘दोखमेनाशिनी’साठी एकांतात नेला जातो, आणि इथे तो मृतदेह गिधाडांसाठी सोडला जातो. यानंतर गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असे केल्यानंतरच त्यांना मुक्ती मिळते. या स्मशानभूमीला ‘टॉवर ऑफ साइलेन्स’ असे म्हटले जाते. मात्र मिस्त्री यांच्यावर वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.