राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, मंगळवार, बुधवारी पावसाची शक्यता!

हवामान खात्याने दिला इशारा

0

मुंबई : गेल्या आठवड्यापासून विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून, आता पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस दाखल होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ-मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. काही भागात अवकाळीच्या सरीही कोसळल्या आहेत. आता हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. 

सध्या पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात हवामान कोरडं आहे. सध्या या भागात दिवसा ऊन रात्री थंडी अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने, पावसाचे कुठेही वातावरण दिसून येत नाही. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यावरून मंगळवरी विदर्भ-मराठवड्यात तर बुधवारी हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो.

तसेच अवकाळी पाऊस असल्याने, मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने, आताच याबाबतची खबरदारी घेण्यात यावी असे आवाहनही हवामानखात्याने केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.