Corona Update : बुधवारची राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाचून तुम्हाला धक्का बसेल!

0

मुंबई कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, दररोज वाढीव आकडे समोर येऊ लागल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असून, बऱ्याच कालावधीनंतर राज्यात एवढ्या मोठ्या संख्येनी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात ४ हजार ७८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता पुन्हा एकदा उलटी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. बुधवारी ३ हजार ८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र त्यात तुलनेत बाधित वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्‌णाचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के आहे. आजापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७६ हजार ९३ (१३.४३) टक्के नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर १६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी ३८ हजार १३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आता ज्या पद्धतीने रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यावरून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.