मुंबई, पुण्यानंतर नागपुरातही शाळा, कॉलेज राहणार बंद, निर्बंध लागू!

पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले कारवाईचे आदेश

0

नागूपर : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनी वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ते निर्बंध लावले जात आहेत. अगोदर मुंबईमध्ये, त्यानंतर पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावती व आता नागपूरातही हे निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेवून त्याबाबतचे निर्णय घेतले जात असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर पुढच्या आठ दिवसात लॉकडाउनबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. उमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील जनतेनी काळजी न घेतल्यास, लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागपूरमध्येही निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

राऊत यांनी लॉकडाऊन नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.  नियमांचे पालन न केल्यामुळेच रुग्णांची वाढ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जावी, याबाबतचेही आदेश त्यांनी दिले आहेत.

असे आहेत नवीन नियम

१) कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.
२) जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा – वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.
३) आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.
४) जिल्ह्यातील हॉटेल (रेस्तराँ) ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.
५) लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम ७ मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद राहतील.
६) कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.
७) करोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.
८) शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.