कोरोना वाढतोय, कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील, मानसिकता तयार ठेवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

0

औरंगाबाद : कोरोनाची संख्या वाढतेय, मात्र याबाबत कोणाला गांभीर्यताच राहिली नाही. हे खरोखरच खूप चिंतेचे कारण आहे. सर्वांनी गंभीरपणे कोरोनाबाबत स्वत:ची काळजी घ्यायला हवी. जगातील अनेक देशांमध्ये जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली, त्यानंतर त्या देशात पुन्हा लॉकडाउन घोषित करावा लागला. राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांची सर्वांसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी, असा सूचक इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिला आहे.

औरंगाबाद येथे आढावा बैठकीसाठी अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, काही गोष्टींबाबत जर आपण वेळीच निर्णय नाही घेतले तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. ग्रामस्थ, नागरीक मास्क वापरण्याचा अजिबातच विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाला गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

READ ALSO : राज्यात गेल्या २४ तासात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू; संख्याही वाढली

दरम्यान रविवारी डिसेंबरनंतर राज्यात ५ हजाराच्या आसपास कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला. सोमवारीही साडेतीन हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. समोर येणारी आकडेवारी खरोखरच चिंताजनक असून, याबाबत नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यांकडून आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.