Corona Update : चिंता वाढली, राज्यात दिवसभरात ८७ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या बाधितांचा आकडा धक्कादायक!

मृत्यूदर वाढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे

0

महाराष्ट्र : कोरोना राज्यात चांगलेच हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाने मृत्यूमुखी पडणारे वाढत असल्याने, यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सरकारकडून सातत्याने निर्बंध लागू केले जात असतानाही रुग्णसंख्या वाढू लागल्याने, त्याला कसे रोखता येईल, याबाबत सरकारी स्तरावर विचार केले जात आहे.

दरम्यान, मंगळवारी राज्यात १७ हजार ८६४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज ९ हजार ५१० रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.७७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ६ हजार ६७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारकडून लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.