आता खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस, ‘इतके’ पैसे मोजावे लागतील!

केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

0

लोकराष्ट्र : देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने सध्या लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. अशात खासगी रुग्णालयानांही लसीकरणाची मान्यता देण्याबाबतचा केंद्र सरकारने विचार केल्याने, आता नागरिकांनी खासगी रुग्णालयातही लस घेता येणार आहे. केंद्राने भारतात सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन लसींना मान्यता दिली आहे.  सध्या देशात याच लशींचे मोफत लसीकरण केले जात आहे. साधारणत: दोन टप्प्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या या लसी सुरक्षित असल्याने, आतापर्यंत लाखो कोविड यौद्धांना दिल्या गेल्या आहेत. मात्र अजूनही मर्यादीत प्रमाणात लसीकरण केले जात असल्याने या लसी खासगी रुग्णालयांना देण्याबाबतचा विचार केंद्र सरकारने निश्चित केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या लस आता सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयातही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केवळ खासगी रुग्णालयात गेल्यावर पैसे मोजावे लागतील. त्याचे दर किती असतील हे देखील निश्चित करण्यात आल्याने आता प्रत्येकाला लस घेणे शक्य होणार आहे.

यावेळी राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या या दोन्ही लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केवळ लोकांना याठिकाणी लस खरेदी करावी लागणार आहे. त्याकरिता सरकारने किंमत देखील निश्चित केली असून, सर्वसामान्यांना परवडणार अशीच आहे. त्याशिवाय सरकारी रुग्णालयांमध्येही ही लस उपलब्ध असणार आहे. याठिकाणी ती पूर्णत: मोफत दिली जाणार आहे. तिचा सर्व खर्च सरकारकडूनच उचलला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच एएआयच्या वृत्तानुसार खासगी रुग्णालयांना २५० रुपयांपर्यंत ही लस दिली जाण्याची शक्यता आहे. या किंमतीत शंभर रुपये सेवा शुल्क देखील असणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असं देखील त्यांनी सूचित केलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.