Corona Update : राज्यात गेल्या २४ तासात १४ हजार ३१७ नवे रुग्ण, ५७ मृत्यू

चिंता वाढली, दररोज रुग्णसंख्येत होत आहे वाढ

0

महाराष्ट्र : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक केले जात असले तरी, वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत आहे. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल १४ हजार ३१७ नवे रुग्ण आढळून आल्याने, यंत्रणेची चिंता वाढली आहे. तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे खूपच गरजेचे झाले आहे.

गेल्या २४ तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ९२.९४ टक्के इतका आहे. पण दुसरीकडे सातत्याने वाढणारी बाधितांची संख्या चिंतेत भर टाकू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, गुरुवारच्या ५७ मृत्यूंसोबत आता राज्यातल्या मृतांचा आकडा देखील वाढून ५२ हजार ६६७ इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर २.३२ टक्के इतका आहे. मुंबईतल्या आकडेवारीचा विचार करता आज दिवसभरात मुंबईत १ हजार ५०९ नवे करोनाबाधित सापडले असून, एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ३८ हजार ६४३ च्या घरात गेला आहे. तर दिवसभरात झालेल्या ४ मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ११ हजार ५१९ वर गेला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.