Corona Update : नाशिक जिल्ह्यात ११६१ कोरोना बाधितांवर उपचार सुरू, २०६ रुग्णांची पडली भर

0

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.११) सायंकाळपर्यंत १ हजार १६१ बाधितांवर उपचार सुरू होते. गुरुवारी दिवसभरात नव्याने २०६ बाधित आढळून आले असून, १५० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी शहरात १४८, ग्रामीणमध्ये ४५, मालेगावला ८ व परजिल्ह्यातील ५ बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या १ लाख १७ हजार ५४७ इतकी झाली असून, त्यापैकी १ लाख १४ हजार ३२० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २ हजार ६६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १ हजार २१८ संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. तर गुरुवारी दिवसभरात ८१० संशयित दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २६ केंद्रांवरून १ हजार ६१० पैकी १ हजार ४७० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. त्यात ५५७ आरोग्य कर्मचारी असून, ९१३ इतर विभागांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.