आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना राहूल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; विरोधकांनी दिल्या ‘शेम शेम’च्या घोषणा!

0

नवी दिल्ली : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरच सर्वत्र बोलले जात असताना गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाचीच सर्वत्र चर्चा रंगली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांचा मुद्या उपस्थित करीत, सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी राहुल गांधींनी फक्त अर्थसंकल्पावर बोलावे असा नियम सांगितला.  मात्र शेती हा अर्थसंकल्पाचाच भाग असल्याचे सांगत काँग्रेस खासदारांनी राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणू नयेत असा सल्ला दिला. मात्र अशातही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने, राहुल गांधी यांनी गोंधळातच भाषण करीत, कृषी कायद्याबरोबरच सरकारच्या मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषणाच्या शेवटी राहूल गांधींनी असे काही केले, ज्यामुळे भाजप खासदारांनी ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधींना खडसावल्याचे दिसून आले.

अर्थसंकल्पावर बोलावे या भाजप खासदारांच्या मागणीनुसार राहुल गांधी यांनी कृषी हे अर्थसंकल्पाचाच भाग असून, अर्थसंकल्पावर येण्यापूर्वी मी फाउंडेशन तयार करीत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र अशातही गोंधळ सुरूच असल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण आटोपते घेत आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘मी फक्त शेतकरी आंदोलनावर बोलणार आहे. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना यांनी श्रद्धांजली वाहिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटांचे मौन बाळगणार आहे. तुम्हीदेखील माझ्यासोबत उभं राहावं’ यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार आपापल्या जागेवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले. यावर ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली तर भाजपा खासदारांनी शेम-शेम अशा घोषणा दिल्या.

ओम बिर्ला म्हणाले की, ‘मला हे सदन चालवण्याची जबाबदारी दिली आहे. तर असं काही असेल तर तुम्ही मला लेखी द्या मी त्यासंदर्भाने विचार करुन निर्णय घेईन. हे योग्य नाही’. त्यानंतर भाजप खासदारांनी एकच गदारोळ करीत सेम सेम च्या घोषणा दिल्या. मात्र काँग्रेस खासदारांनी सभागृहात मौन बाळगत आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.