हा तर राजकीय वेश्याव्यवसाय, व्ही नारायणसामी यांची घणघाती टीका!

पद्दुचेरी हे राज्य काँग्रेसच्या हातून गेले

0

पुद्दुचेरी : सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी घणघाती टिका केली आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांचा संधीसाधू म्हणून उल्लेख केला जाईल अशी टीका त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल. त्याचबरोबर ते म्हणाले की, पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे, असा उद्वेकही त्यांनी व्यक्त केला. तसेच सत्याचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

READ ALSO : अखेर पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं, बहुमत सिद्ध करण्यात अपयश!

नारायणसामी म्हणाले की, भाजपा जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आम्ही दोन भाषांचा वापर करतो, पण भाजपा जबरदस्ती हिंदी लादत आहे, केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली असून पुद्दुचेरीमधील जनता आणि देश त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही नारायणसामी यांनी राज्यपाल भेटीनंतर व्यक्त केला आहे.

दरम्यान, व्ही. नारायणसामी सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र त्यात अपयश आल्याने, हे राज्य काँग्रेसच्या हातून गेले आहे. बंडखोर आमदारांमुळे पद्दुचेरीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागल्याचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी म्हटले. त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर संतापही व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.