किती बलात्काऱ्यांना पाठीशी घालणार? कुणाचं तरी लेकरू गेलंय, थोडी लाज असू द्या – चित्रा वाघ आक्रमक

0

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणाला दिवसागणिक वेगवेगळे वळण मिळत आहे. याप्रकरणात जेव्हापासून वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे, तेव्हापासून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवून दिली आहे. विशेषत: भाजपकडून सरकारवर हल्ला चढविण्यात आला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशी मागणी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, याबाबतची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकवेळी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संजय राठोड यांची पाठराखण केली जात आहे. 

यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘अजून कुठवर आणि किती बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारं ? कुणाचं तरी लेकरू गेलयं थोडी लाज असू द्या’ त्यांच्या या ट्विटमध्ये राज्यसरकारच्या कारवाईबाबत तीव्र संताप दिसून येत आहे. जेव्हापासून संजय राऊत यांचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र सरकारची चालढकलची भूमिका या प्रकरणाला वेगळेच वळण देत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.