चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाणचा ‘हा’ फोटो शेअर करीत, केली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

जो बोया है.....वही पायेगा !! तेरा किया आगे आयेगा

0

मुंबई : तब्बल १४ दिवसाननंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांसमोर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘माझी आणि समाजाची बदनामी थांबवा, तपासात सत्य समोर येईलच’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे स्पष्टीकरण तोकडे असून, तेच पूजा चव्हाणचे हत्यारे असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला आहे. त्याबाबतचे एक ट्विटही त्यांनी शेअर केले असून, त्यामध्ये पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड यांचा एक फोटो शेअर केला आहे.

‘जो बोया है…..वही पायेगा, तेरा किया आगे आयेगा  महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटसोबत त्यांनी संजय राठाेड आणि पूजा चव्हाणचा एकत्रित असलेला एक फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, चित्रा वाघ सुरुवातीपासूनच या प्रकरणी आक्रमक भूमिका घेताना दिसून आल्या आहेत. संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर चित्रा वाघ यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला होता.

संजय राठोड हाच पूजा चव्हाणचा हत्यारा असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जावा असा घणाघात त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही याबाबतची मागणी केली होती. ज्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. त्यातुनासर संजय राठोड हेच पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातच आता ‘गबरु’नावाच्या एका व्य्क्तीची पूजा राठोड सोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहे. त्यामध्ये गबरु नेमका कोण हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.