गर्भपात झालेली पूजा राठोड आणि आत्मत्या केलेली पूजा चव्हाण एकच : चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट

गर्भपात केलेल्या डॉक्टरची आई अचानक आजारी पडून तो रजेवर कसा काय जातो, असा सवाल

0

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक खळबळजनक खुलासे केले. त्यांनी यवतमाळमध्ये गर्भपात करण्यात आलेली पूजा राठोड आणि पुण्यात आत्महत्या केलेली पूजा चव्हाण एकच असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पूजा राठोडचा गर्भपात करणारा डॉक्टर दुसऱ्या दिवसापासून आठ दिवसांच्या रजेवर कसा काय जातो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर नसलेला डॉक्टर गर्भपात करतो. दुसऱ्या दिवशी त्याची आई आजारी पडते आणि तो रजेवर जातो, अशा प्रकारचा योगायोग गेल्या २० ते २४ वर्षांच्या सामाजिक जीवनात बघितलेला नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. राज्यात महिला आयोगाला अध्यक्षच नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, संजय राठोड यांची चौकशीच नाही, मग अहवाल कुठला पाठवला? राठोड यांना पोलिसांना ताब्यात घ्या, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे, पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या अरुण राठोडच्या मोबाईलवर हा फोन, त्यावेळी संजय राठोड फोनवर होते, असा दावा वाघ यांनी केला.

सिनीअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे, हे आम्ही शोधून काढू, विधीमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरु. पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी दोघांची चौकशीही पोलिसांनी केली नाही, की त्यांना सोडून द्यायचं ठरलं होतं? त्यांच्या घरांना टाळं लागल्याचं मीडियात पाहिलं होतं,असंही वाघ म्हणाल्या. पूजा चव्हाणचा फ्लॅट सील, वरच्या फ्लॅटमध्ये पाहणी, माझ्या कमरेइतके उंच ग्रील, वानवडी पोलिसातील सिनिअर पीआय लगड यांचा रगेलपणा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.