‘मास्क घाला लॉकडाऊऊन टाळा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

0

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होताना दिसत आहे. विशेषत: विदर्भात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेने कठोर निर्णय जारी केले आहेत. पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला असून, लॉकडाउन हवा की नाही याचा विचार जनतेनीच करावा. त्यामुळे मास्क वापरा, नियमांचे पालन करा. जर पालन केले नाही तर लॉकडाउन निश्चित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याबाबतचा आठ दिवसांचा अल्टिमेटमही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले की, ’राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर मी पुढील आठ दिवसात तुमच्याकडून घेणार आहे. मी पाहणार ज्यांना लाकडाऊन नको असेल ते नागरिक मास्क घालती, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करतील. तर ज्यांना लॉकडाऊन हवा आहे, ते नियमांचे पालन करणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनीच आता लॉकडाऊनबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.’ यावेळी मुख्यमंत्री यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिल्याने राज्यात लॉकडाऊन घोषित केला जाणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, मोठी घोषणा करण्याची शक्यता

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा धोका वाढत असल्याने आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. आतापर्यंत आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवलि. आता मी जबाबदार ही मोहिम राबवूया. कोरोनाला रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देवूया. ऑफिसच्या वेलांची विभागणी करा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी आपण पक्ष वाढवूया, कोरोना नको असाही राजकारण्यांना सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी गर्दी करणाऱ्यांना आंदोलनांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यात धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांसह महत्त्वांच्या दिवसांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगितले. शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे सुरू केला जाणार असल्याचेही त्यांननी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक सहकारा अहोरात्र मेहनत घेत असल्याचे सांगत ते कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. अनेक कोविड यौद्धांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू द्यायचे नाही. मुळात कोविड यौद्धेच आता व्हायला नको. त्यामुळे मास्क ही आपली ढाल आहे. त्याचा योग्य वापर करून कोरोनासारख्या क्षत्रुला दूर ठेवा असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले. दरम्यान, राज्यात कोरोनाची स्थिती आणखीनच बिघडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.