औरंगाबाद शहराची तहान भागविणाऱ्या जलकुंभाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

दिल्लीगेट येथीलनियोजित जलकुंभाच्या कामाची पाहणी करून प्रकल्पाची माहिती घेतली

0

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत शहरात ५० पेक्षा अधिक जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीगेट येथील नियोजित जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहितीसुद्धा घेतली. 

दोन दशकांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर गुरुवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गरवारे क्रीडा संकुल आणि दिल्लीगेट येथे जलकुंभ बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीगेट येथे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निवासस्थाजवळ जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती देणारे फलक याठिकाणी लावण्यात आले होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी अजय सिंग, प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेबद्दल त्यांना थोडक्यात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. दिल्लीगेट येथे बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाची क्षमता तीस लाख लिटर इतकी आहे. जलकुंभाची उंची २० मीटर राहणार आहे. ६३ हजार नागरिकांना या जलकुंभाचा फायदा होई्‍ल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.