आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल; छत्रपती संभाजीराजे संतापले

0

कोल्हापूर : देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह बघावयास मिळत आहे. शिवभक्तांकडून सर्वत्र शिवजयंतीचा जल्लोषात उत्सव साजरा केला जात आहे. जयंतीनिमित्त संपूर्ण देश शिवमय झाला असून, ठिकठिकाणी देखावे आणि आकर्षक सजावटी लक्ष वेधून घेत आहेत. शिवनेरी किल्ल्यासह रायगडावरील उत्सवी वातावरण यातून याठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाकडून रोषणाई करण्यात आली आहे. मात्र ही रोषणाई बघून छत्रपती संभाजीराजे भासले चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विट करून ‘भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल’ अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. 

शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवरही रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मात्र या रोणाईबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगीबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,’ अशा शब्दात संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र अशातही शिवजयंतीचा उत्साह बघण्यासारखा आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने, सरकारने मिवरणूकीसह गर्दी जमविण्याबाबतचे काही नियम ठरवून दिले आहेत. मात्र अशातही शिवभक्तांचा उत्साह बघण्यासारखा आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या या नाराजीबद्दल आता पुरातत्व विभाग काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.