मानसिकता बदला, नशिब बदलेल!

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत नशिब बदलत नाही. बऱ्याचदा आपण मोठा विचार करीत नाही. जे मिळते त्यातच समाधान माणून आयुष्य जगतो. मात्र एका ठराविक काळानंतर आपल्याला संधी होती, मात्र तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष केले असा विचार मनात येतो. खरं तर हा पश्चाताप असतो. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अगोदर मानसिकता बदलायला हवी. जोपर्यंत आपण मानसिकता बदल नाही, तोपर्यंत आपले नशिब बदलणार आहे. अर्थात याकरिता काही गोष्टी आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. जसे

सकारात्मक विचारांच्या मानसांचा गोतावळा : जोपर्यंत आपण आपल्या आजुबाजूला सकारात्मक माणसांचा गोतावळा तयार करणार नाही, तोपर्यंत आपल्या यशाची दिशा सापडणार नाही.

यशस्वी व्यक्तिंचे चरित्र वाचा : प्रत्येक यशस्वी व्यक्तिच्या यशाचा प्रभावित करणारा असा प्रवास असतो. त्याचे वाचन केल्यास आपल्याला आपल्या प्रवासाला सुरुवात करण्यास मदत होते.

प्रेरणादायी वाचन : जोपर्यंत आपण चांगले विचार वाचत नाही, तोपर्यंत यश नाही. त्यामुळे नेहमीच प्रेरणादायी वाचन करायला हवे.

चांगले चित्रपट बघावे : सोशल मीडियावर भरपूर व्हिडीओज आपल्यापर्यंत येतात. मात्र त्यातील चांगले आणि मोजकेच व्हिडीओ आणि चित्रपट आपण बघायला हवेत.

वरिलपैकी ज्या-ज्यो गोष्टी तुम्हाला शक्य आहेत, त्या-त्या नककी करा. शक्यतो सगळ्याच करण्यासारख्या आहेत. अशाने तुमची पुढील वाटचाल नक्कीच जास्त आश्वसाक आणि उज्जवल होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.