Photo : ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेचा हा ‘धाकड’ लुक बघितला काय?

0

लाफ्टर क्वीन ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नेहमीच आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारी श्रेया सध्या तिच्या धाकड लुकमुळे सोशल मीडियात चर्चिली जात आहे. या लुकमधील तिचे काही फोटोज सध्या व्हायरल होत असून, त्यास नेटिझन्सकडून चांगलीच पसंती मिळत आहे. 

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील लाफ्टर क्वीन अर्थात अभिनेत्री श्रेय बुगडे तिच्या विनोदी शैलीमुळे घराघरांत पोहोचली आहे.

भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, डॉ. निलेश साबळे या कलाकारांमध्ये श्रेया आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.

विविध कलाकारांच्या नकला करणे किंवा मंचावर एकापेक्षा एक विविध पात्र साकारून श्रेया सगळ्यांचे मनोरंजन करत असते.

सोशल मीडियावरही श्रेया मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. श्रेयाचे विविध फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

श्रेयाने तिचे काही ‘धाकड’ अंदाजातले फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेयर केले आहेत. शर्ट, जॅकेट, जीन्स असा हा श्रेयाचा डॅशिंग लूक यात पाहायला मिळतोय. श्रेयाचे हे फोटो चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.