देशाचा कारभार ‘हम दो हमारे दो’ अशा चारच लोकांच्या हाती, राहुल गांधींचा हल्लाबोल!

0

नवी दिल्ली : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारची भूमिका बघून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या देशाचा कारभार ‘हम दो-हमारे दो’ याप्रमाणे चांरच लोकांच्या हाती असल्याचा हल्ला त्यांनी सरकारवर चढविला. राहुल गांधी म्हणाले की, या कायद्यांमुळे बडय़ा उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल.

यासाठी दोन उद्योगपती असून, दोन नेत्यांनी हा देश दोन उद्योगपतींच्या हाती दिला आहे. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनासंदर्भातील हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ दिला आणि केवळ चार लोक या देशाचा कारभार करीत असल्याची  जोरदार टीकाही केली.

Read Also : आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना राहूल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; विरोधकांनी दिल्या ‘शेम शेम’च्या घोषणा!

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत त्याला गांधी यांनी पाठिंबा दर्शविला. हे केवळ शेतकऱ्यांचेच आंदोलन नाही तर देशचळवळ आहे आणि सरकारला कायदे रद्द करावेच लागतील, असेही लोकसभेत गांधी म्हणाले. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २०० जणांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने श्रद्धांजली वाहिली नाही, त्यामुळे आपल्याला ते काम करावे लागत आहे, असे सांगून गांधी यांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली आणि त्याला तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने पाठिंबा दिला. नव्या कायद्यांमुळे भारताची अन्न सुरक्षा यंत्रणा धोक्यात येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल, असेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.