Budget 2021 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३३ विधेयके होणार सादर

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

0

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प  सोमवारी (दि.१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावली आहे.

संस्थेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३८ विषय चर्चेसाठी घेतले जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. यामध्ये ३३ विधयके आणि पाच अर्थविषयक मुद्यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, सोमवारच्या अर्थसंकल्पात कोणाच्या वाट्याला काय येणार याबाबत  तर्कवितर्क लावले जात आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर भरीव तरतुदींची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.