सनी लिओनीने ‘हा’ हॉट फोटो शेअर करीत म्हटले, ‘माझ्याशी लग्न कराल का?’

एका चाहत्यांने म्हटले ‘अब्बा नाही ऐकणार’

0

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून तुफान लाइक केले जाते. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावत असल्याने, तिच्या प्रत्येक पोस्टची जणू काही चाहत्यांना प्रतिक्षाच असते. आता तिने एक असाच फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तीचा ग्लॅमरस अंदाज बघून चाहते तिच्यावर घायाळ होत आहे. सनीने हा फोटो शेअर करीत त्याखाली खूपच मजेदार असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये सनीने लिहिले की, ‘माझ्याशी लग्न कराला का?’ तिच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट दिल्या आहेत.

तिच्या चाहत्यांनी हा फोटो लाइक केलाच, शिवाय तिच्याशी लग्न करण्याची एका पायावर तयारी दर्शविली. मात्र काहींनी तू अगोदरच लग्न केलेलं आहे असा सवालही उपस्थित केला. एकाने लिहिले की, ‘अब्बा ऐकणार नाहीत.’ तर अनेकांनी सनीला चक्क अगोदर घटस्फोट घे नंतर लग्नाचं बघू असा सल्लाही दिला. पण काहीही असो, सनीने हा फोटो शेअर करून चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. कारण तिच्या या अजब-गजब कॅप्शनमुळे चाहते भलतेच खुश झाले असून, त्यास त्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स केले आहे. एका तासतच सुमारे १ लाखांपेक्षा अधिक लाइक मिळाल्याने, सध्या सनीचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.

दरम्यान  सनी या फोटोमध्ये ती एका स्विमसूटमध्ये दिसत होती. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘जर कोणी माझे नाव विसरले असेल तर, माझी टोपी पाहा, तेथे माझे नाव लिहिले आहे.’ सनीचा हा फोटो ६ लाखाहून अधिक लोकांना आवडला होता. सनी लिओनीची आगामी वेब सीरिज अनामिकाच्या सेटवर जोरदार हंगामा झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.