जॅकलिनचा टॉपलेस फोटो बघून ‘हा’ अभिनेता झाला घायाळ, आगीच्या ज्वालांचे इमोजी केले शेअर!

0

मुंबई : श्रीलंकन ब्युटी असलेली बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या भलतीच चर्चेत आहे. खरं तर तसं कारणही आहे. तिने नुकताच एक फोटो शेअर केला असून, केवळ चाहतेच नव्हे तर बॉलिवूडचे सितारेही तिचा हा फोटो बघून घायाळ झाले आहेत. खरं तर जॅकलिन नेहमीच तिच्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करीत असते. सोशल मीडियावरील तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता तिचा असाच एक फोटो समोर आला असून, त्यातील तिचा हॉट अंदाज बघून अनेकजण घायाळ झाले आहेत.

जॅकलिनने नुकताच तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक बघण्यासारखा आहे. कॅमेऱ्याकडे तिची नजर खूपच काही बोलून जाते. ब्लॅक ॲण्ड व्हाइट फिल्टर असणारा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या मादक अदांचे चाहते दिवाणे होत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्यालाही तिचे सौदर्यं बघून प्रतिक्रिया द्यावशी वाटली.

जॅकलिनची ही पोस्ट पाहून अभिनेता आणि सूत्रसंचालक मनीष पॉल हा अक्षरश: घायाळ झाला आहे. त्यामुळेच त्याने आगीच्या ज्वालांचं चिन्हं (इमोजी) कमेंट बॉक्समध्ये शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, जॅकलिने तिच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचं राजस्थानमधील चित्रीकरण तिनं नुकतंच पूर्ण केलं. तिनं चित्रपटाच्या सेटवरील फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत जॅकलिन स्क्रीन शेअर करणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.