लहान मुलाच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी सोनू सूदने केली मदत, ट्विटला दिला तत्काळ रिप्लाय!

शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांची आवश्यकता होती

0

आपल्या दानशूरपणामुळे नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना मदत केली आहे. विशेषत : कोरोनाच्या संकट काळात तो अनेकांसाठी देवदूत म्हणून पुढे आला आहे. विशेषत: वैद्यकीय कारणासाठी त्याने नेमहीच अनेकांना मदत केली आता. आता पुन्हा एकदा तो अशाच एका कारणामुळे चर्चेत आला असून, त्याने एका लहान मुलाच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. 

त्याचे झाले असे की, एका व्यक्तिने त्याच्या लहान भावासाठी ट्विटच्या माध्यमातून सोनू सूदकडे मदत मागितली होती. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘सर, माझ्या लहान भावाच्या पायाचे ऑपरेशन करायचे आहे. त्याकरिता एक लाख रूपये खर्च आहे. माझे वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत. त्यामुळे एवढा खर्च करणे आम्हाला शक्य नाही. त्याच्या या ट्विटनंतर लगेचच सोनूने त्याला मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे त्या व्यक्तीच्या भावावर यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने एक ट्विट करीत सोनूचे आभार मानले.

त्यामध्ये म्हटले की, ‘सर, गेल्या तीन महिन्यांपासून पैशांअभावी आम्हाला आमच्या लहान भावावर उपचार करता येत नव्हते. पण, आता तुमच्या एका सहकार्याच्या मदतीमुळे हे उपचार करणं शक्य झालं. माझ्या भावाला पायावर उभं करण्यासाठी मनापासून खूप आभार.’ दरम्यान, या व्यक्तीचं ट्विट पाहिल्यानंतर सोनू सूदनेदेखील त्याला उत्तर दिलं आहे. ‘पैशांअभावी उपचार होत नसतील तर, आपण कोणत्या अधिकाराने भारतीय आहोत’, असं म्हणत सोनू सूदने या व्यक्तीला रिप्लाय दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.