भाजप आमदारांच्या ‘जय श्रीराम’ घोषणा, ममता बॅनर्जी संतापल्या!

भाजप-ममता बॅनर्जी यांच्या वाद चक्क विधानसभेत पोहोचल्याचे दिसून आले

0

सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप विरूद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा थेट सामना सुरू असून, दरदिवसाला नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. आतापर्यंत रस्त्यावर बघावयास मिळत असलेली ही राजकीय लढाईआता चक्क विधानसभेत पोहोचली आहे. आता ‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून नवे वांदग निर्माण झाले आहे.

त्याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी अर्थसंकल्पावर भाषण देत होत्या, तेव्हा भाजप आमदारांकडून विधानसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावर ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्याचे दिसून आले. विरोधी आमदारांच्या या कृतीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या व त्यांनी म्हटले की, ”मी आजपर्यंत कधीच बजेट दरम्यान अशाप्रकारची घोषणाबाजी पाहिली नाही.भाजपाला बजेटवर चर्चा नकोच आहे.”

भाजपा आमदरांनी आज बंगाल विधानसभेत जोरदार गदारोळ केला. राज्य सरकारद्वारे राज्यपालांना सत्राच्या पहिल्या दिवशी न बोलावण्यात आल्याने आमदार नाराज होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व डाव्या पक्षांच्या आमदारांनी देखील बजट सत्रावर बहिष्कार टाकला. ममता बॅनर्जींची नाराजी व सभागृहातील गोंधळामुळे बजेट सादर करण्यासही उशीर झाला.

या अगोदर २३ जानेवारी रोजी व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देखील, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणाबाजीमुळे चांगल्याच भडकल्या होत्या. तेव्हा त्यांनी भाषण करण्यास नकार देत, जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.