Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये ‘या’ दोन आयपीएस अधिकाऱ्यांचे एकमेकांना आव्हान!

लक्ष्यवेधी लढत : संबंध देशाचे लक्ष लागून

0

कोलकाता : देशातील काही राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी, सध्या देशात पश्चिम बंगालमधील निवडणुकीची सर्वाधिक चर्चा रंगत आहे. भाजप विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा थेट सामना असल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता आहे. ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी यांच्यात नंदीग्राममध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याचबरोबर पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील डेबरा विधानसभा जागेसाठीची लढतही खूपच लक्ष्यवेधी ठरत आहे.

या विधानसभा मतदारसंघातून चक्क दोन माजी आयपीएस अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अधिकारी म्हणून ठसा उमटविल्यानंतर हे अधिकारी आता राजकारणाच्या आखड्यात स्वत:चे नशिब आजमावत आहेत. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली आहे. टीमएसीने माजी आयपीएस अधिकारी हुमायुन कबीर यांना उमेदवारी दिली तर भाजपनेही भारती घोष यांना मैदानात उतरविले आहे.

डेबरा विधानसभेची जागा मिदनापूर मतदारसंघात येते. भाजपने पहिल्या दोन टप्प्यातील ५७ उमेदार जाहीर केले आहेत. घोष यांचा त्यात समावेश असून, ते भाजपचे उपाध्यक्षही आहेत. तर दुसरीकडे डेबरा हे हुमायूं कबीर यांचे मूळ शहर आहे. या दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये डेबरा सीटवर थेट संघर्ष सुरू आहे. हुमायू कबीर टीएमसीकडून पहिल्यांदाच नशिब आजमावत आहेत. तर भारती घोष यांनी यापूर्वी घाटाळमधून लोकसभा निवडणूक लढविली आहे.

आता सर्वांचीच नजर डेबराच्या जागेवर आहे. कारण येथे स्पर्धा दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांमधील आहे. याबाबत भाजपच्या भारती घोष म्हणतात की, त्ांनी पश्चिम मेदनापूरमध्ये सेवा बजावली आहे. त्या पश्चिम मिदनापूर आणि झारग्रामची पोलीस प्रमुख होत्या. तर डेबरा हे हुमायूं कबीर यांचे मूळ शहर असून, त्यांचे पालक अजूनही त्याच मतदारसंघात राहतात. त्यामुळे कबीर यांना हा परिसर चांगलाच ठाऊक आहे.

दरम्यान, प्रशासनात सेवा बजावल्यानंतर दोन्ही माजी अधिकारी आता राजकारणाच्या पटावर स्वत:ला सिद्ध करायला निघाल्याने, यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे संबंध देशाचे लक्ष लागून आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.