शुभमंगल सावधान : मॅट्रिमॉनिअल वेबसाइटवर लग्नासाठी जोडीदार शोधतांना घ्या खबरदारी

थोरामोट्यांचे ऐकूणच घ्या निर्णय

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा
आजच्या काळात मॅट्रिमॉनिअल (ऑनलाईन) किंवा फेसबुकवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट टाकून लग्नासाठी जोडीदार शोधतांना अनेक मुले-मुली आढळतात परंतु हे करतांना खबरदारी घ्यावि कारण फसवणूक होवू शकते संकेतस्थळे वापरताना लक्षात ठेवा की कुठलीही लग्नेच्छू व्यक्ती, तुम्हास ऑनलाईन भेटो किंवा ऑंफलाईन, तो-ती कशी आहे समजण्यास वेळ लागतो, तितका तो द्या, आणि मगच विचार पक्का करा नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल.

लग्नाचा विचार करतांना थोरा मोट्यांचं ऐकुण निर्णय घेतले पाहिजे ! नाही तर, चार इयत्ता जास्त शिकलो म्हणुन आमचे निर्णय आम्ही घ्यायला सक्षम वगैरे आहोत असा विचार मनात ठेवुन निर्णय घ्यायला जाल तर अडचणीत याल.ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा तर लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन घटस्फोट होतात.

बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या ऑनलाईन भेटीतून किंवा मॅट्रिमॉनिअल वेबसाइट वर कसे समजणार नाही का ? वैवाहिक वेबसाइट वरून चाटिंग करून स्वत:बद्दलची चुकीची माहिती देवून त्याला/तिला प्रेमपाशात अडकविण्याचे प्रकार घडत आहे तेव्हा सावध रहा .धाकादायक बाब म्हणजे अशा साइटच्या माध्यमातून काही मुले /मुली स्वत:ची खरी माहिती लपवून दुसरा विवाह करतात असे हि प्रकार शहरांमध्ये घडलेले आहे . मुला-मुलीच्या लग्नासाठी पालक आयूष्य भर पुंजी जमवत आसतात परंतु लग्न निरखून नाही केले तर आयूष्यभर नशिबाला दोष धरण्याची वेळ येते

इंटरनेट चे तोटे आणि धोके लक्षात घेतले पाहीजे . इंटरनेट हे फायद्यासाठी आणि सुरक्षितपणे कसे वापरायचे हे आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा ::

१ लग्न करायचा विचार पक्का झाला असेल तरच आपली माहिती लग्नविषयक साइटसवर नोंदवा.
२. विवाहसंकेतस्थळावर असलेल्या माहितीवर पूर्णत: विश्वास ठेवू नका मुला /मुलीच्या शिक्षणाबद्दल , नोकरी विषयी ठिकाणाविषयी प्रत्यक्ष त्याच्या/तिच्या ऑफिसात जाऊन तेथील लोकांना भेटून चौकशी करून घ्या आणि एकदा तरी त्याचे/तिचे संपूर्ण तपशील गुगलवर चेक करा शक्य झाले तर . त्त्याच्या/तिच्या फेसबुक अकाऊंट वर हेरगिरी करा
३. स्मार्ट फोनवर त्याचा/तिचा फोन नंबर ट्रु कॉलर अॅपवर तपासा म्हणजे त्याचे/तिचे नाव बरोबर आहे का इतके तरी किमान तपासून घेता येईल..
४. विवाह पूर्वी २-३ वेळा मुला-मुलीनी एकमेकाची भेट घ्यावी .
५. विवाह इच्छुक जर परदेशातील असेल तर हेरगिरी केलेले केव्हाही चांगले त्यासाठी शक्य असल्यास खाजगी गुप्तहेरांची मदत घ्या
६ मुलीच्या पालकांनी शक्य असल्यास आपली मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून वावरणार आहे, त्या घराची पार्श्वभूमी, नवरा मुलगा, त्याच्या सवयी, व्यसने, त्याची नोकरी/व्यवसाय, मित्र कंपनी या गोष्टींची खात्रीलायक चौकशी करण्यासाठी सुद्घा खासगी गुप्तहेरांचा वापर करावा .

फक्त मुलींना किंवा स्त्रियांनाच असे अनुभव येतात असे नाही. प्रेमांधळे पुरुषही ‘हळव्या’ स्त्रीच्या गोडगुलाबी बोलांस फसू शकतात.बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते सावध रहा .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.