पूजा चव्हाण प्रकरणात ‘या’ मंत्र्याचे नाव आले समोर; भाजपकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हॉरल, भाजप आक्रमक

0

लोकराष्ट्र : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्र धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात समोर येत आहे. होय, सध्या राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत जीवन संपविले आहे. मात्र या तरुणीच्या आत्महत्त्येमागे एका बड्या मंत्र्याचा हात असल्याची माहिती समोर आल्याने, राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्या नावाचा उघड उल्लेख करीत त्यांचा त्यामध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली. 

सोशल मीडियावर टिक-टॉक स्टार अशी ओळख असलेल्या पूजाने आत्महत्या का केली? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे. त्यातच याप्रकरणी भाजप आक्रमक झाल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केल्याने, प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तसेच आमच्याकडे सबळ पुरावे असून, पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली जावी असा दावाही भाजपच्या काही नेत्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणी आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहायला आली होती. ती पुण्यात भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. मात्र अचानकच तिने ७ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. वानवडी पोलिसांनी याबाबतची प्राथमिक चौकशी करून अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र त्याच्या काही दिवसातच पूजाच्या आत्महत्त्येमागे विदर्भातील एका बड्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला जाऊ लागला.

याचदरम्यान, सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून, पूजाची आत्महत्त्या कि हत्या असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. या ऑडिओ क्लिपमध्ये पूजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्याचे संभाषण ऐकावयास मिळते. संभाषणानुसार त्यांच्या नेमके काय संबंध होते, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. पूजाने उपचार करावेत, आत्महत्त्या करू नये असाही संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास मिळतो. त्यामुळे नेमके उपचार कुठले याबद्दलही वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. तसेच आम्हाला कोणाच्याही विरोधात तक्रार द्यायची नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र ज्या पद्धतीच्या ऑडिओ क्लिप समोर येत आहेत. त्यावरून हे प्रकरण सरळ नसून, त्यात अनेक वाटा असल्याचेच दिसून येत आहे. सध्या समाज माध्यमांवर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. या क्लिपमधील आवाज संबंधित मंत्र्यांच्या आवाजाशी मिळता जुळता आहे.

यासोबतच तिने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या मित्राला ‘तो’ मंत्री “कोणत्या परिस्थितीत तिच्या जवळचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे” असे म्हणत असल्याचे म्हणत आहे. तिला दवाखान्यात दाखव हे तो मंत्री का म्हणतोय, हा प्रश्नही यातून निर्माण होतो आहे. या प्रकरणात दोन ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर यात आणखी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपसमोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पूजाच्या मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये नेमके काय दंडलय याबाबत अद्यापर्यंत कुठलाही खुलासा समोर आला नाही. मात्र ज्या पद्धतीने घडामोडी समोर येत आहेत, त्यावरून पूजा चव्हाण प्रकरणात खूप मोठा घोळ असावा असेच दिसत आहे. त्यातच भाजप या विषयावरून आक्रमक झाल्याने पोलीस कुठल्या दिशेने तपास करणार आहेत, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.