Video : ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत!

अज्ञात हल्लेखोरांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला आहे

0

कोलकाता : सध्या पश्चिम बंगालमधील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेक धक्कादायक घडामोडी समोर येऊ लागल्याने, ही निवडणूक देशभरात चर्चिली जात आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली असून, हल्लेखोरंनी हल्ल्यांनरत त्यांना जखमी अवस्थेतच कारमध्ये बसविल्याचा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये तीन ते चार तासांपासून लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यावेळी कोणताही स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात नव्हता. अशात चार-पाच लोकांनी गाडी बंद केली. त्यावेळी कोणताच लोकल पोलीस कर्मचारी नव्हता. एसपी देखील नव्हते. हे जाणूनबुजून करण्यात आले आहे माझ्या छातीतही दुखत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना आता तातडीने कोलकात्याला आणलं जात आहे. कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, भाजप नेते अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी नाटक करत आहेत, असा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी खोटं बोलण्यात माहिर असल्याचेही अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ठाऊक आहे की, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे त्या सहानुभूतीसाठी प्रयत्न करत आहेत, असं अर्जुन सिंह म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.