महंगाई डायन है : समोसा महाग झाला म्हणून वकिलाने दिला आपल्या पदाचा राजीनामा

नागपूरमधील घटनेची विधी जगतात जोरदार चर्चा

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नागपूर : सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला असून, अशी कोणतीच गोष्ट नाही, जी महाग झाली नाही. अगदी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या दरातही वाढ केली असून, चहापासून इतर पदार्थांची चव घेताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. सध्या महागाईवरून असाच एक विषय समोर आला असून, सध्या या विषयाची विधी जगतात जोरदार चर्चा रंगत आहे. त्याचे झाले असे की, न्यायालयाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमधील समोसा महाग झाल्याने, जिल्हा बार असोसिएशनचे (डीबीए) कार्यकारिणी सदस्य ॲड. धर्मराज पी. बोगटी यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने सर्वच खाद्यपदार्थांमध्ये वाढ झाली आहे. गॅस, मजूरी वाढल्याने हॉटेलमधील खाद्यान्‍नही महागले. या वाढत्या महागाईचा फटका आता वकिलांनाही बस आहे. शहरातील सिव्हिल लाइन्स येथील जिल्हा न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये समोस्यांच्या दरात वाढ झाली आहे. डीबीएतर्फे चालवल्या जाणाऱ्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती मर्यादेपलीकडे वाढवण्यात आल्याचे ॲड. बोगाटी यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे.

नियमानुसार डीबीएने वकिलांना माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यायला हवेत. मात्र, येथे उलटे आहे. डीबीएचे अधिकारी आपले खिसे भरण्यासाठी खाद्य पदार्थांच्या किमती वाढवत असल्याचा आरोप ॲड. बोगाटी यांनी केला आहे. कँटीनमध्ये एक प्लेट समोसा ३० ते ४० रुपयांना विकला जात आहे, हे विशेष. बाहेरच्या तुलनेत ही किंमत खूप जास्त असल्याचा आरोप वकिलाने केला आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. बाहेरच्या किमतींची तुलना केली तर तुम्हाला दिसेल की किमतीत फारसा फरक नाही. पण, दरवाढीला मुद्दा बनवून कुणी सदस्य राजीनामा देत असल्यास जिल्हा न्यायालयात दुसरा मोठा मुद्दा नाही, असेच म्हणावे लागेल. वास्तविक, कार्यकारिणी सदस्य असमाधानी आहेत. इतर सदस्यांचे काम चांगले सुरू आहे. ॲड. बोगाटी यांच्या राजीनाम्याचा विचार करू,असे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड कमल सतुजा यांनी म्हटले आहे.

माफक दरात खाद्यपदार्थ मिळणे हा वकीलांचा अधिकार

हायकोर्ट बार असोसिएशनच्या कॅन्टीनमध्ये जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थांचे माफक दरात मिळणे अपेक्षित आहे. असे असताना सुद्धा समोशाचे दर वाढवण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड. धर्मराज बोगटी यांनी केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.