रामदास पेठ परिसरात हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

0

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकास रामदासपेठ पोलिसांनी अटठक केली आहे. या युवकाविरूद्ध दहशत पसरविण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ‘विजयनगर येथील रहिवासी राज चंदू सासर (वय-२१) हा बजरंग चौक विजयनगर येथे हातात तलवार घेऊन नागरिकांना धमकावत होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत इंगळे, हसन शेख, तोहिद अली, किशोर गवळी, संजय अकोटकर, गजानन खेडकर, शिवकुमार दुबे, अन्सार शेख, स्वप्निल चौधरी, विशाल चव्हाण, श्रीकांत पातोंड, अमोल शिरसाट यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.