PHOTOS: भल्या पहाटे ईडीकडून ताब्यात ते आठ तासांच्या चौकशीनंतर अटक; नवाब मलिक प्रकरणात अशा घडल्या घडामोडी!

नवाब मलिक यांना अटक केली असून, ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे

0

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून, त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

भल्या पहाटेच ईडीच्या दारात गेली होती. त्यांनतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे.

आम्ही लढू आणि जिंकू, ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची कार्यालयाबाहेर प्रतिक्रिया

मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं, असं नवाब मलिक यांनी न्यायालयात सांगितलं आहे.

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे.

मलिक यांना चौकशीसाठी घेऊन गेल्यापासूनच ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

आज सकाळी नवाब मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यलयात आणलं गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर तसंच मलिकांच्या निवासस्थानाबाहेरही जमले आहे.

या अटकेमुळे दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.