‘झारीतला शुक्राचार्य कोण’ असा सवाल उपस्थित करीत संजय राऊंत यांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेची केली मागणी

0

नाशिक : सरकार अर्णव गोस्वामी याला अटक का करत नाही. पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक याबाबत अर्णव गोस्वामीला आधीच माहिती ककशी मिळाली, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत ‘झारीतला शुक्राचार्य कोण?’ असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

नाशिक दौऱ्यावर असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेचीही मागणी केली. पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक याबाबतची माहिती अर्णव गोस्वामीकडे कशी होती, याचा शोध घ्यायचा असेल तर अर्णव गोस्वामीला अटक करायला हवी. अर्णवला अटक करावी, ही मागणी आम्ही या अगोदरही केली आहे. मात्र केंद्र सरकारने अजून ती मागणीही मान्य केली नाही.

हेही वाचा : राज्यपालांविरुद्ध शीत नव्हे तर उघड युद्ध : शिवसेना खासदार संजय राऊत 

अर्णवऐवजी इतर कोणी असते, तर केंद्राने तातडीने कारवाईची पावले उचललीअसती. मात्र अर्णवबाबत केंद्राला एवढा पुळका का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, त्यांनी राज्यपालांवरही यावेळी टिकास्त्र सोडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.