आरोग्य विद्यापीठाचा संशोधन आणि विकास कामांवर अधिक भर असलेला अर्थसंकल्प मंजूर

विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव देणे गरजेचे - कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर

0

नाशकि :  विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला तर लेखा अहवाल डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले. याप्रसंगी अधिसभेतर्फे मा. कुलगुरुयांच्या कुलगुरु पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रंसगी अध्यक्षीय मनोगतात मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात संशोधन विभाग या स्वंतत्र्य विभागाची स्थापना करण्यात आली आहे. सदर विभागामार्फत संशोधनाशी संबंधित कामकाज चालविण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयांनी देखील याच धर्तीवर स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील संशोधन विभागात समन्वय राखून संशोधनास प्रोत्साहन देणे गरजेचे
असल्याचे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, गुणात्मक दर्जा वाढवून आंतरराष्ट्रीय उंची गाठण्याचे ध्येय समोर ठेऊन विद्यापीठाने प्रयत्न करावेत. ते पुढे म्हणाले की विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विविध उद्दिष्टये आणि नवीन योजना कार्यान्वीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाकडून ज्ञान संवर्धन करण्यासाठी विद्यापीठातर्फे व्यवसाय मार्गदर्शन, विविध विषयांवर व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांकरीता कल्याणकारी योजना, संशोधन कार्यशाळा, विद्यार्थी अॅप, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार आणि संवाद कौशल्या, व्यक्तीमत्व विकास आदींवर प्रभावी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदु असुन अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी भरपुर तरतुदी व मोठया प्रमाणावर विकास कामे प्रस्तावित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सन 2021 – 2022 अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न रु. 35125 लक्ष इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये 35616 लक्ष इतका अपेक्षित असल्याने वित्तीय
तूट रुपये 491 लक्ष इतकी अपेक्षित आहे. संशोधन कार्यशाळा आणि परिषदांच्या मार्फत विद्यार्थी कल्याणकारी योजनेसाठी रु. 500 लक्षची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत सामाजिक जाणीव जागृती लेखाशीर्षातर्गत अवयवदान, कुपोषण व स्वच्छमुख अभियान आदीकरीता रु. 30 लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित माहिती, योजनांची सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाने मआविवि विद्यार्थी अॅप डन्भ्ैजनकमदज ।चच तयार केले आहे. ते अधिक अद्ययावत करण्यासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात रु. 25 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून संशोधन व विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ऐरोली येथील बांधकाम, नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील जमीन खरेदी व बांधकामे आदींचा समावेश आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी रु. 10 लक्ष इतकी तरतूद अर्थसकल्पात करण्यात आलेली आहे. संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांना संशोधन प्रसिध्द करण्यासाठी संधी व चालना मिळण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने सर्व विद्याशाखांसाठी मआविवि आरोग्य विज्ञान संशोधन नियातकालिक सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी रु.10 लक्ष इतकी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयांतील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने ई -लर्निंग सेंटर उभारण्यात येऊन, ई लेक्चर सीरीजचे आयोजन करण्यासाठी अर्थसंकल्पात रु. 100 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

संलग्नीत महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यापीठ प्राधिकरण सदस्य यांना विद्यापीठाच्या कामा निमित्त नेहमीच विद्यापीठात किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यासाठी त्यांना बराच प्रवास करावा लागतो. विद्यापीठाच्या कामा निमित्त संलग्नीत महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यापीठ प्राधिकरण सदस्य बाहेर असतील त्यावेळेस जर त्यांचा अपघाती, नैसर्गिक, अकस्मात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशावेळी विद्यापीठामापर्फत त्यांना काही मदत मिळावी या हेतूनेया अर्थसंकल्पात रु. 50 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण सदस्यांना कार्यबाहुल्यामुळे विद्यापीठाच्या विविध बैठकांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. प्रत्येक बैठकांमध्ये सहभाग असावा या उद्देशाने या अर्थसंकल्पात रु.100 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने आरोग्य केंद्राची स्थापना विद्यापीठ आवारात केलेली आहे. सदर केंद्रामार्फत कर्मचाृयांना आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार हे विद्यापीठ आवरातच मोफत पुरविण्यात येतात. त्यासाठी या अर्थसंकल्पात औषधे, वैद्यकीय साहित्य खरेदी, आरोग्य शिबीर इत्यादीसाठी रु.15 लक्ष इतकी तरतूद
करण्यात आलेली आहे.

विद्यापीठाने कोवीड-19 सुरक्षा कवच योजनेसाठी बाधीत विद्यार्थ्याला उपचारासाठी रु. एक लाख पर्यंत अर्थिक मदत किंवा दुर्देवी मृत्यू झाल्यास कुटूंबाला रु. तीन लक्ष अर्थिक मदत करण्याची तरतूद अर्थसकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पासाठी गठीत समितीमध्ये अध्यक्ष सचिन मुंब्रे तर सदस्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. बाबासो माळी, डॉ. प्रताप भोसले, श्रीमती ज्योती दुबे, डॉ. राजेश जांेधळेकर, वैद्य निलाक्षी प्रधान, डॉ. अरुण डोडामणी, डॉ. समिर गोलावार, डॉ. आशुतोष गुप्ता, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, श्री. संदीप कुलकर्णी, वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर होते.

या अधिसभेत डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजश्री नाईक, डॉ. मीरा औरंगाबादकर, डॉ. धनाजी बागल, डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. मिलींद देशपांडे, डॉ. मनिषा कोठेकर, डॉ. बाबासो माळी, डॉ. अमित भस्मे आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते तसचे डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. किशोर मालोकर, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. यशवंत पाटील, डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. समिर गोलावार, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. कृष्णा केळकर, डॉ. प्रमोदिनी पागे, डॉ. रविंद्र भोसले, डॉ. सदानंद देशपांडे, डॉ. बाळासाहेब घुले, डॉ. रमेश भरमाल, वैद्य शारसुंदर भाकरे, वैद्य दत्तात्रय पाटील, श्रीमती ज्योती ठाकरे, श्रीमती निकिता पाडवी, श्री. आशिष मनोहर, डॉ. बालाजी डोळे, श्री. प्रशांत पवार आदी
अधिसभा मोठया संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.