इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून उतरलेली ‘ती’ व्यक्ती कोण?

0

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले असून, सध्या ते २५ मार्चपर्यंत एनआयएच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना अटक करण्यात आल्यापासून आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. जेव्हा ही स्कॉर्पिओ कार सापडली होती, तेव्हा तिच्या मागेच इनोव्हा कारही असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. आता या इनोव्हा कारमधून एक व्यक्ती चक्क पीपीर्स किट घालून खाली उतरत असल्याचे समोर आले आहे.

पीपीई किट घालून फिरणारी ही व्यक्ती कोण? याचा आता एनआयएकडून तपास घेतला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे. सध्या त्यादृष्टीनेच तपास सुरू असून, असे झाल्यास अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. सचिन वाझे सध्या २५ मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.

READ ALSO : सचिन वाझे यांना ११ दिवसांची NIA कोठडी, वाझेंची प्रकृती बिघडली?

दरम्यान, एनआयए यांनी यापूर्वीच सचिन वाझे यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते सचिन वाझे यांचा जरी या प्रकरणात सहभाग असला तरी, मास्टरमाइंड दुसराच आहे. सध्या त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सध्या एनआयए या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात असून, सचिन वाझे यांच्याकडून त्याचे नाव वदवून घेण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

दरम्यान, सचिन वाझे अटकेप्रकरणी आता उच्चन्यायालयात धाव घेण्यात आली असून, त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांचे वकील सनी पुनमिया यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाझे यांची अटक बेकायदेशीर असून त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा देखील नाहीये. यावर एनआयने न्यायालयात कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करत हा मोठा कट असून यामध्ये अटक आणि रिमांड गरजेचं असल्याचं सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.