सर्वसामान्यांना आणखी एक ‘शॉक’, ‘इतक्या’ रुपयांनी वीज महागणार!

ऐन सणासुदीत ही दरवाढ केली जाणार आहे

0

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा

अगोदर महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आणखी एक झटका सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने, सर्वत्र उत्सवी वातावरण आहे. नेमक्या याच दिवसा महावितरण आपल्या ग्राहकांना मोठा शॉक देणार आहे. सर्वसामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील महावितरण ग्राहकांचं वीज बिल येत्या काळात ६० ते ७० पैसे प्रति युनिट म्हणजेच १५० ते २०० रुपयांनी अधिक येण्याची शक्यता आहे. वीज उत्पादन खर्च वाढलाय. त्याचा भार इंधन समायोजन शुल्काद्वारे अखेर ग्राहकांवरच येणार आहे.

राज्य सरकारी महनिर्मिती कंपनीला केवळ राज्य सरकारच्याच महावितरण कंपनीलाच वीज विक्रीची परवानगी आहे. कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीचा खर्च वाढलाय. नोव्हेंबरनंतर ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

दिवसागणिक महागाईचा भडका वाढताना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे देखील सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इंधन, गॅस सिलेंडर, दूधाच्या दरात वाढ झाल्यानंतर,  आता वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे महिलांचं महिन्याचं गणित कोलमडणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.