Corona Update : अकोला जिल्ह्यात सोमवारी ४६३ नवे कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू!

जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे

0

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, दररोज उच्चांकी रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी (दि.१) जिल्ह्यात तब्बल ४६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३७० वर पोहोचली आहे.

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९८ तर रॅपिड ॲण्टिजेन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकुण ४६३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६ हजार ६०८ वर पोहोचली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी चाचण्यांचे दोन हजार ७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरीत एक हजार ६७४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सकाळच्या सत्रात अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये तेल्हारा २४, मुर्तिजापूर २३, एमआयडीसी १८, अकोट १०, खडकी ९, बाळापूर ८, शेलू बोंडे ७, सुकळी, देवळी व रामनगर येथील प्रत्येकी ५, जठारपेठ, जीएमसी, रामदासपेठ व तुलखेड येथे प्रत्येकी ४, गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी व नया अंदुरा येथे प्रत्येकी ३, डाबकरी रोड, लक्ष्मीनगर, रणपिसे नगर, खदान, कौलखेड, आकाशवाणी, मलकापूर, मोठी उमरी, वरुर, वाशिंबा, जीएमसी हॉस्टेल, हरिहर पेठ, संत नगर, दत्त कॉलनी, अंभोरा येथे प्रत्येकी २, तर रोहणखेड, चितलवाडी, हिंगणा रोड, उमरी, किर्ती नगर, पीकेव्ही कॉलनी, गोरेगाव, रतपुतपूरा, वडद बु., एकलरा, लोहारा, देवगाव, विताली, कापरवाडी बु., अन्वी, वनीरंभापूर, मनारखेड, हिवरखेड, तेल्हारा, अकोट फैल, राऊतवाडी, शिवनगर , गड्डम प्लॉट, बार्शिटाकळी, खोलेश्वर, हिंगणा फाटा, न्यू राधाकिसन प्लॉट, घोटा, पुनोती, राहित, जमठी खु,, दहातोंडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, सोमवारी २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ६६४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.