मोठी घोषणा : मुंकेश अंबानी गुजरातमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठा प्रकल्प!

या प्रकल्पासाठी कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे

0

अहमदाबाद : गुजरात राज्य आणि मुकेश अंबानी यांचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. मुळचे गुजरातचे असणाऱ्या अंबानी कुटुंबियांनी नेहमीच गुजरात राज्याला भरभरून दिले आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या या घराण्याने गुजरातमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहे. आता पुन्हा एकदा असाच एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरात सुरू करण्याबाबत अंबानी कुटुंब सज्ज झाले आहे. रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून जगभरात विविध क्षेत्रांमध्ये अरबो रुपयांची गुंतवणूक करणारे अंबानी कुटुंब आता चक्क प्राण्याच्या विश्वात मोठी गुंतवणूक करणार आहेत.

रिलायन्सचे कॉरपोरेट अफेअर्सचे संचालक परिमल नाथवानी यांनी सांगितले की, गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारले जाणार असून, त्याची सुरुवात २०२३ मध्ये केली जाणार आहे. या प्रकल्पाला कोट्यावधी रुपयांचा खर्च येणार असून, त्याबाबतचे संपूर्ण नियोजन करण्यात आल्याचेही परिमल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अंबानी कुटुंबियांनी व्यापार टेक्नॉलॉजी आणि ई-कॉमर्स मध्येही आपला विस्तार केला आहे. त्याचबरोबर त्यांनी क्रिडा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून त्यांचा संघ आयपीएलमध्ये असून, आतापर्यंत सर्वाधिक विजेतेपद पटकाविण्याचा मान त्यांच्या मुंबई इंडियन्स या संघाने मिळविला आहे. त्याव्यतिरिक्त २०१४ मध्ये त्यांनी फुटबाॅल लीगही सुरू केली होती.

आता ते प्राण्याच्या विश्वात गुंतवणूक करणार असून, त्याकरिता त्यांनी गुजरात राज्य निवडले आहे. मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी या २०१९ मध्ये न्यू यॉर्कच्या मेट्रोलिटन कला संग्रहालयाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सहभागी झाल्या होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.