शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी, त्यांच्या तोंडून कधीच शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नाही; राज ठाकरेंची सडकून टीका!

राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा : राज ठाकरे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या दोन सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केल्याने, राज्यातील वातावरण ढवळून निघाले. औरंगाबादच्या सभेत देखील राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच शरद पवार यांच्यावर टीका करीत, पुन्हा एकदा ते जातीय राजकारण करीत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्यावर जोरदार जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांना ‘हिंदू’ या शब्दाचीच ॲलर्जी असल्याचेही म्हटले.

READ ALSO : भोंग्याच्या मुद्यावर बोलत असतानाच सुरू झाली अजान; राज ठाकरेंनी संतापून, ‘‘आताच्या आत्ता…’’

राज ठाकरे म्हणाले की, ‘‘रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून. गुरु शिष्याच्या नात्याचा कधी संबंध येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठंही वाचलेलं नाही. रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळींमध्ये ते छत्रपतींना क्षमा केली पाहिजे असे सांगतात. हे मी लिहिले आहे मला माफ करा असे त्यांनी म्हटले आहे. कुठच्या शाळेतील शिक्षक असे लिहितो. मी इतकी वर्षे शिकलो मला आठवत नाही कुठल्या शिक्षकाने माझी माफी मागितली. ही माफी नाहीये प्रेम आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

READ ALSO : Live : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पाहा इथे

“शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?,” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

READ ALSO : ‘‘सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे’’, भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंचा इशारा!

“शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.