लग्नानंतरची आलिया भट्टची पहिली झलक; पहा फोटो!

लग्नानंतर तीनच दिवसात आलिया कामावर परतली

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. लाग्नानंतर तीन दिवसांत रणबीर कामावर हजर झाला होता. आता आलियासुद्धा कामावर परतली आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या आलियाची पहिली झलक प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केली. लाईट पिंक कुर्ता-पायजमा, कपाळाला छोटीशी टिकली आणि हातावरची पुसट होत चाललेली मेहंदी असा आलियाचा साधा पण सुंदर लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

दरम्यान पाली हिलमधील वास्तू या बंगल्यात रणबीर आणि आलियाचा शाही विवाह सोहळा झाला. लग्न सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.