अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

राजकीय व्यक्तींनी तारतम्य ठेवूनच विधानं केली पाहिजेत असे अजित पवार म्हणाले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जाहीर सभेत ब्राह्मण व पुरोहितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी ब्राम्हण समाजाच्यावतीने त्यांच्याविरूद्ध आक्रमक आंदोलन होत आहे.मिटकरींच्या वक्तव्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. राजकीय व्यक्तींनी तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहीजेत असे पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसेच नाराजी वाढणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे, असे पवार म्हणाले. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या भाषानंतर राष्ट्रवादी आणि अखिल ब्राह्मण महासंघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. मिटकरींनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी करत पुण्यात ब्राह्मण महासंघाने आंदोलन केले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.