अजित डोवालांच्या जीवाला धोका ; हल्ल्याचा रचला कट, ‘या’ दहशतवादी संघटनेने आखला कट!

0

नवी दिल्ली : भारत-चीनसह अनेक परराष्ट्र मुद्यांवर महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्याची पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘जैश ए मोहम्मद’ने योजना आखली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संघटनेने राजधानी दिल्ली येथे विविध ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती प्राप्त होताच, अजित डोवाल यांच्या घर व कर्यालयाभोवतीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

उरी सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकनंतर डोवाल चर्चेत होते. ततेव्हापासून ते दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना जीवे मारण्याबाबतचा कट आखला जात होता. त्याबाबतची टेहाळणीही करण्यात आली आहे. याची माहिती सुरक्षा यंत्रणा आणि गृहमंत्रालयाला मिळताच सर्व यंत्रणांना सज्ज करण्यात आले आहे.

जैशचा दहशतवादी हिदायत उल्लाह मलिक याच्या चौकशीतून ही माहिती समोर आले असून, व्हिडीओच्या माध्यमातून ही टेहाळणी करण्यात आल्याचे समजते. मलिक हा जैशचा दहशतवादी आहे. त्याला जम्मूच्या अनंतानागमध्ये ६ फेब्रुवाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याचा साठा सापडला होता. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.