‘वो जुमलों का शोर मचाते हैं, और हम…’, पेट्रोल दरवाढीवरून राहुल गांधींची शेरोशायरीच्या अंदाजात टीका!

0

लोकराष्ट्र : सलग ११ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ नोंदविली गेली आहे. अगोदर राजस्थानमध्ये पेट्रोल शंभरी पार गेल्यानंतर गुरुवारी मध्यप्रदेशातही पेट्रोलने शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील बहुतांश राज्य शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. अशात पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीमुळे वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. या दरवाढीला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे राज्य सरकारच्या करांमुळेच दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने अवास्तव कर लावल्याने पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे. लोकांच्या या तीव्र भावना लक्षात घेवून आता विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे.

‍काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अत्यंत शलक्या भाषेत ट्विट करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी शेरोशायरी अंदाजामध्ये सरकारवर टीका करताना पेट्रोल-डिझेल दरवाढीला केंद्रच जबाबदार असल्याचे ठामपणे म्हटले आहे. राहुल यांनी या ट्विटमध्ये देशातील भाजप प्रणित सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटच्या सुरुवातीलाच ‘वो जुमले का शोर मचाते है, और हम सच का आईना दिखाते है’ अशा शायरी अंदाजात भाजपला लक्ष केले. त्यांनी लिहिले की, जून २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा कच्चा तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होते. गेल्या ७ वर्षाताच कच्चा तेलाचे दर ३० डॉलरने स्वस्त झाले आहेत. पण अशातही पेट्रोल सेंच्युरी करत आहे. तर डिझेल त्याच्या पाठोपाठ आहे. २०२१ मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०१९ या काळात पेट्रोल १७.५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झाले असल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.

सध्या त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा असून, सरकार याकडे कसे बघते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, दिल्लीत पेट्रोलचे दर ९०.१९ रुपये तर डिझेलसाठी ८०.६० रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९६.६२ रुपये तर डिझेलचे दर ८७ रुपये ६७ पैशांपर्यंत वाढले आहेत. यासोबत कोलकत्ता (पेट्रोल-९१.४१) आणि बंगळुरूमध्येही (९३.२१) पेट्रोल नव्वदीपार झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.