Watch Video : ‘त्या’ बोल्ड सीनमुळे सायली संजीव चर्चेत, सोशल मीडियावर तिच्या ‘झिम्मा’ची चर्चा

0

‘जागतिक महिला दिना’निमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टीझर मुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सायली संजीवचा बोल्ड सीन सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. हा टीझर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात असून, सायलीने चाहत्यांची मने जिंकल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाच्या टीझरपेक्षा सायलीच्या त्या बोल्ड सीनचीच सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील सायली संजीवने बोल्ड सीन दिला आहे.

मराठी मालिकांमध्ये सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या सायलीने चित्रपटांमध्ये मात्र थोडी हटके भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. सायलीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात सायलीला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळालं आहे. ‘झिम्मा’मध्येही ती एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिच्या भूमिकेची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील तिच्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये अंघोळ करतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यात सायली बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यानंतर सायलीच्या बोल्ड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटात ७ वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची भूमिका ही सायली संजीवची आहे. ‘झिम्मा’ हा चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सायलीसोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेवकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सात बायका आणि एक पुरुष आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.