महिला दिनी विशाखा कसबे आणि संध्या शिंदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा उपक्रम

0

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्यावतीने देवळाली गावातील तक्षशिला विद्यालयाच्या शिक्षिका विशाखा कसबे आणि संध्या शिंदे यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने गौरविण्यात आले.

गणित आणि इंग्रजी या विषयात गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षिकांचा ‘धम्मगिरी’ तर्फे गौरव करण्यात आला. एम. ए. बीएड इंग्लिश असे शिक्षण घेतलेल्या विशाखा कसबे आणि एमएससी बीएड, गणित असे शिक्षण घेतलेल्या संध्या शिंदे यांना ‘आदर्श शिक्षिका २०२१’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वास्तविक हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना समजण्यात नेहमीच क्लिष्ट राहिले आहेत.

मात्र या दोन्ही शिक्षिकांनी अत्यंत सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्यापन करीत विद्यार्थ्यांना या विषयात परांगत केले. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने त्यांचे विद्यार्थी या दोन्ही विषयात अत्यंत उत्कृष्ट गुण संपादन करीत आहेत. याचाच विचार करून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन्मान चिन्ह, पुष्प गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक जगदीश पवार, प्राचार्य महेश ठाकरे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत खरे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. विशाल जाधव, डॉ. अजय पुररीवार, पवन भदर्गे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.