अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन आले अन्‌… राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट!

0

ठाणे :  लॉकडाउन काळात सर्वसामान्यांना भरमसाठ वीज बिले येऊ लागली म्हणून मनसे मैदानात उतरली. तेव्हा भाजप कुठे होता. हा प्रश्न तत्काळ निकाली निघावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी बोललो. याबाबतचे मी त्यांना पत्रही लिहिले. सरकारनेही हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र नंतर कळाले की, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन आले अन्‌ सरकारने या प्रश्नी घुमजाव केला. अन्‌ तेव्हा मलाही कळालं की आता वीजबिल कमी होणार नाही. असे गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन जास्त चिघळत चालले आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत, हे केंद्र सरकारने  पाहिले पाहिजे. केंद्राने जो कायदा केला आहे. तो चुकीचा नाही. मात्र, ज्या काही त्रुटी राहील्या आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. एक दोन लोकांसाठी या कायद्याचा उपयोग होता कामा नये. आज जे आंदोलन करत आहेत ते शेतकरी आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कृषी कायदा  करताना केंद्राने राज्यांशी चर्चा करुन कायदा करायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मला असे वाटते हे फारच चिघळले आहे. आम्ही हे सगळे पाहत आहोत. शेतकरी हा सामान्य आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत. त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे, याचा शोध घ्यावा. पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खाते आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणे वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. आता हे आंदोलन  इतके चिघळायची गरज नव्हती.

आज जे काही चाललं आहे, ते चुकीचे आहे. भारत रत्न असलेल्यांना पुढे करुन केंद्र सरकार त्यांना बोलायला लावत आहेत. कोण कुठली ती गायिका, तुम्हाला तरी माहीत होती का? केंद्र सरकार तिला उत्तर देते? अनेक सिलेब्रिटी यांना ट्विट करायला लावू नये. ही सगळी साधी माणसे आहेत . त्यांचा वापर अशा साठी होऊ नये, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी ट्विट करत परदेशी गायिकेला उत्तर दिले होते. त्यावर राज यांनी नाव न घेता भाष्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.