विवेक ओबेरॉयला ‘मस्ती’ नडली; विनामास्क, विनाहेल्मेट बाईक राईड केल्यानी पोलिसांनी ठोठावला दंड!

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र अशातही अभिनेता विवेक ओबेरॉयकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालविल्याने त्याला ५०० रुपयांचे ई-चलन पाठविण्यात आले आहे. तर मुंबईतील जुहू पोलिसात विवेक ओबेरॉयविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, व्हॅलेंटाइन डेला विवेक ओबेरॉयने बाईकवरून पत्नीसोबत मुंबईत फेरफटका मारला. याबाबतचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विवेक हेल्मेट न घालताच बाईक चालविताना दिसत आहे.  आश्चर्याची बाब म्हणजेच विवेकने पत्नीसोबतच्या त्याच्या राईडचा एक व्हिडीओही आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्याखाली कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘व्हॅलेंटाइन डेची मस्त सुरुवात… मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड’ अशा आशयाचे विवेकने कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, विवेकने या राइडमध्ये हेल्मेट घातले नसल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी त्याचा हा व्हिडओ ट्विटरवर शेअर करत काही प्रश्न उपस्थित केल्याने, पोलिसांनी तातडीने कारवाई करीत विवेकला दंड ठोठावला आहे. विवेकने हेल्मेटविना बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे. तसेच मास्क न घातल्याने तोही नियमभंग ठरतो. युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचं वर्गीस यांनी लिहिलं होतं.वर्गीस यांच्या या ट्विटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेकला ५०० रुपयांचं चलानही मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.